MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 3 November 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 3 November 2021

| Updated on: Nov 03, 2021 | 4:20 PM

शिवप्रतिष्ठान संघटनेकडून एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला तसंच त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वानखेडेंचा सत्कार केला.

शिवप्रतिष्ठान संघटनेकडून एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला तसंच त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वानखेडेंचा सत्कार केला. समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमागे उभं राहायला हवं, अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना नवाब मलिक यांच्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले आपल्या समर्थकांसह मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयासमोर दाखल झाले. थोड्याच वेळात समीर वानखेडे ऑफिसमध्ये आले. यावेळी ऑफिसच्या समोरच वानखेडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच शिवप्रतिष्ठाकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.