MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 4 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 4 October 2021

| Updated on: Oct 04, 2021 | 4:40 PM

अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून त्याच्यासह इतर दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.

अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून त्याच्यासह इतर दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. शाहरुखच्या लेकाने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची रात्र एनसीबी कोठडीत गेली.

एनसीबीने  आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने शनिवारी रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने आर्यनसह दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रविवारी रात्री दबंग खान सलमान रात्री 10 च्या आसपास शाहरुखच्या घरी पोहोचला. अर्धा तास त्याच्याशी चर्चा केल्यानंतर तो शाहरुखच्या घराबाहेर पडला. या भेटीत त्याने शाहरुखला धीर दिल्याची माहिती आहे.