MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 6 December 2021
राजकीय लोकांच्या लग्नात प्रचंड गर्दी पाहिला मिळाली. लोकं अजिबात ऐकत नाहीत. त्यामुळे देशपातळीवर नियमांबाबत निर्णय झाला तर प्रत्येक राज्य त्याची अंमलबजावणी करेल, असं अजित पवार म्हणाले.
ओमिक्रॉन बाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. सध्या वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्याबाबत कडक भूमिका केंद्राने घ्यायला हवं. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळवर नियमांचं पालन होतं आहे की नाही याकडे लक्ष द्यायला हवं. कारण कोरोनाची सुरुवात मुळात भारतात एक जोडपं दुबई वरून आलं होतं आणि त्यांनी प्रवास केल्यानंतर त्यांच्या सोबतच्या ड्राइव्हरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा प्रसार झाला होता. आत्ताच्या देखील काळात वेगवेगळ्या राज्यात एक दोन रुग्ण सापडत आहेत. देशपातळीवर आरोग्य विभाग आणि डब्ल्यूएचओ नवं नियमांबाबत एक सूचना काढणं गरजेचं आहे. जे दोन डोस घेतलेले आहेत त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे बूस्टर डोस बाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा. आपल्याकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत. राजकीय लोकांच्या लग्नात प्रचंड गर्दी पाहिला मिळाली. लोकं अजिबात ऐकत नाहीत. त्यामुळे देशपातळीवर नियमांबाबत निर्णय झाला तर प्रत्येक राज्य त्याची अंमलबजावणी करेल, असं अजित पवार म्हणाले.