MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 28 December 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 28 December 2021

| Updated on: Dec 28, 2021 | 4:37 PM

संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम असलेल्या नितेश राणेंनी न्यायालयात धाव घेतलेय. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अगदी थोड्याच वेळात न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंकडून वकिलांची मोठी फौज उभी करण्यात आले. नितेश राणेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना नोटिस आल्यानंतर नितेश राणे नॉट रिचेबल आहेत.

संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम असलेल्या नितेश राणेंनी न्यायालयात धाव घेतलेय. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अगदी थोड्याच वेळात न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंकडून वकिलांची मोठी फौज उभी करण्यात आले. नितेश राणेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना नोटिस आल्यानंतर नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. आता न्यायालयात नितेश राणेंना दिलासा मिळतो काय हे पाहावं लागेल.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना 18 डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेण्यात आलं असल्याची माहिती आहे. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. दरम्यान संतोष परब शिवसैनिक असल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.