MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 2 December 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 2 December 2021

| Updated on: Dec 02, 2021 | 7:00 PM

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.

देशात ओमिक्रॉनचा अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.

कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढे आहेत. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापैकी एकाचं वय 66 असून दुसरा व्यक्ती 46 वर्षाचा आहे.