MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 24 January 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसामंध्ये महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. आता शरद पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन माहिती काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याबाबतची माहितीही पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबाबत आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे’, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.