MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 3 December 2021
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची माहिती दिलीय. उगाच पॅनिक केलं जात आहे. कोरोनानंतर आलेल्या म्युकर मायकोसिसची जी भीती होती ती यात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत या विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली येईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकात ओमिक्रॉनची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. अशावेळी महाराष्ट्र सरकारनं मोठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळावर आतापर्यंत 800 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची माहिती दिलीय. उगाच पॅनिक केलं जात आहे. कोरोनानंतर आलेल्या म्युकर मायकोसिसची जी भीती होती ती यात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत या विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली येईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
ओमिक्रॉनबाबत राज्यात पूर्णपणे खबरदारी घेतली जात असून मुंबई विमानतळावर आतपर्यंत 800 जणांची RTPCR चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटक सीमेवर सध्या कोणतेही निर्बंध घातले जाणार नाही. केंद्र सरकार घेईल त्या निर्णयाप्रमाणे राज्य निर्णय घेईल असं टोपे म्हणाले. याशिवाय नागरीकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.