महाराष्ट्राच्या ‘महानंद’ची ओळख पुसली जाणार? ‘महानंद’चा कारभार गुजरातमधून चालणार?
महानंद या कंपनीकडून सध्या १ लाख लीटर दूध वितरण केले जाते. अन्य संस्थांकडून ४० हजार लीटरपेक्षा कमी दूध पुरवठा, खासगी संस्थांकडून दूध घेण्याची वेळ येते. तर ९ लाख लीटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणारी यंत्रणा वापराविना पडून
मुंबई, ३ जानेवारी २०२४ : महाराष्ट्राच्या महानंदचा कारभार गुजरातमधून चालणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. महानंदचा कारभार गुजरातस्थित एनडीडीबीला देण्याचा ठराव महानंदच्या संचालक मंडळाकडून पास करण्यात आला आहे. अमूलला राज्यातील दूधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, महानंद या कंपनीकडून सध्या १ लाख लीटर दूध वितरण केले जाते. अन्य संस्थांकडून ४० हजार लीटरपेक्षा कमी दूध पुरवठा, खासगी संस्थांकडून दूध घेण्याची वेळ येते. तर ९ लाख लीटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणारी यंत्रणा वापराविना पडून आहे. काही वर्षांपासून महानंद तोट्यात आहे. या संस्थेकडे कामगारांचीही मोठी थकबाकी आहे. महानंदकडे सध्या ९३७ कामगार आहेत यापैकी ५६० कामगारांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज गेला आहे. मात्र या कामगारांच्या स्वेच्छानिवृत्तीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.