Prakash Ambedkar | महापरिनिर्वाणदिनी अनुयायांनी मुंबईला येणं टाळावं, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर जाणारच, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र महापरिनिर्वाण दिनी मुंबईत न येण्याचं आवाहन आंबेडकरी जनतेला केलं आहे. महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेबांना घरूनच अभिवादन करा. चैत्यभूमीवर येणं टाळा, असं आवाहन प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही? अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल कुणालाच अंदाज येत नाहीये. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं असं माझं आवाहन आहे. शासनाचे नियम पाळा. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.