मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला मंत्रिपद मिळेल; भाजपच्या ‘या’ मित्रपक्षाला आशावाद
मंत्रिमंडळ विस्तार मागच्या काही दिवसांपासून रखडला आहे. अनेकांना मंत्रिपदाची आशा आहे. भाजपच्या मित्रपक्षानेही मंत्रिपद मिळण्याबाबत आशावाद व्यक्त केलाय. पाहा...
पुणे : मंत्रिमंडळ विस्तार मागच्या काही दिवसांपासून रखडला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असं सत्ताधारी पक्षांकडून सांगण्यात येतंय. अशात अनेकांना मंत्रिपदाची आशा आहे. रासपचे नेते महादेव जानकर यांनीही मंत्रिपद मिळण्याबाबत आशावाद व्यक्त केलाय. “आमची फार ताकद आहे, असं मी म्हणत नाही. पण लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. आमच्या पाठीशी जी काय ताकद आहे ती पुणे पोटनिवडणुकीत वापरणार आहे. चार राज्यात आमचं काम आहे. आमचे आमदार आहेत. गुजरातला आमचे 28 नगरसेवक आहेत. भाजपाला गरज वाटली तर मला मंत्री करतील. नाही वाटली तर सोडून देतील, असं महादेव जाणकर म्हणालेत.
Published on: Feb 15, 2023 08:12 AM
Latest Videos