भाजप आमदार मोनिका राजळेंचे चौकार-षटकार, कॉलेज टीमची कॅप्टन 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात
शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) या अतिशय शांत स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र राजळेंचं वेगळंच रुप क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळालं.
शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) या अतिशय शांत स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र राजळेंचं वेगळंच रुप क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळालं. कॉलेज जीवनात क्रिकेट संघाचं नेतृत्व करणाऱ्या राजळे जवळपास 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात उतरल्या आणि त्यांनी गोलंदाजी-फलंदाजी केली. मोनिका राजळे या अहमदनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. अहमदनगरमधील पाथर्डीत नगर परिषदेतर्फे एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार मोनिका राजळे यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता. राजळे डॉक्टर इलेव्हन संघात सहभाग घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरल्या होत्या. यावेळी त्यांनी बॅटिंग आणि बॉलिंगसह मैदानात फिडिंग देखील केली.
Latest Videos