भाजपकडे 'पेठां'ची पाठ? 28 वर्षांपासूनचा बालेकिल्ला हातून कसा निसटला?, बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

भाजपकडे ‘पेठां’ची पाठ? 28 वर्षांपासूनचा बालेकिल्ला हातून कसा निसटला?, बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Mar 02, 2023 | 11:45 PM

VIDEO | गिरीश बापट यांचा वावर असलेला आणि त्यांनी बांधलेला कसबा पेठं काँग्रेसनं कसा भेदला? बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना 73 हजार 284 मतं मिळाली आणि रविंद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला. Whi Is Dhangekar? असं प्रश्न करणाऱ्या भाजपचा अभेद्य किल्ला रविंद्र धंगेकर यांनी भेदला. कसब्यात २८ वर्षांनंतर इतिहास घडवत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी भाजपचा किल्ला भेदला. नेमकं काय आहे यामागचं कारण? महाविकासआघाडीची एकजूट हा फॅक्टर ठरला की मग रविंद्र धंगेकर यांचा वैयक्तिक करिश्मा… पेठेतल्या मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली की मग, इतर काही गणितं होती, कसब्यातील भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाची कारणं नेमकी काय? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात…

Published on: Mar 02, 2023 11:45 PM