Raj Thackeray Video : ‘विधानसभेच्या निकालानं महाराष्ट्र शॉक, विजयानंतरही इतना सन्नाटा क्यो?’, महायुतीच्या यशावर राज ठाकरेंना शंका
विधानसभेतील इतक्या मोठ्या विजयानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा का होता? असं म्हणत राज ठाकरे यांनी विधानसभा निकालावर शंका उपस्थित केली आहे. भाजपने आधी आरोप करून नंतर सत्तेत घेतलेल्या लोकांवरून देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला.
विधानसभा निकाल अविश्वसनीय असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी महायुतीच्या विजयावरच शंका वर्तवली आहे. मात्र यात रंजक गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी निकालावर प्रश्न उपस्थित केला. पण भाजपाला मिळालेल्या 132 जागा आपण समजू शकतो. असं म्हणत भाजपच्या विजयाला क्लिनचीट दिली आहे आणि अजित पवार यांचे 43 आमदार कसे काय जिंकले? असा प्रश्न विचारला आहे. फक्त चारच महिन्यात लोकांचं मतदान कसं काय बदलू शकतं? असं म्हणत राज ठाकरे यांनी लोकसभेचाही दाखला दिला आहे. लोकसभेत आठ खासदार मिळवणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाचे विधानसभेत फक्त दहा आमदार जिंकले आणि एक खासदार जिंकणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाचे 43 आमदार आले. तुलनात्मक जागांचा हिशेब केल्यास शरद पवारांचा पक्ष चार महिन्यांच्या अंतरात 38 मतदारसंघात कमी झाला तर 37 मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षानं आघाडी घेतली आहे. लोकसभेवेळी 13 खासदार मिळवणाऱ्या काँग्रेसचे फक्त सोळा आमदार येऊ शकले तर 9 खासदाराच्या भाजपचे तब्बल 132 आमदार निवडून आलेत.
तुलनात्मकरित्या काँग्रेस फक्त चार महिन्यात 56 मतदारसंघात पिछाडीवर गेली तर भाजपने तब्बल 78 मतदारसंघात मुसंडी मारली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच एक व्यक्ती इतक्या मोठ्या विजयानंतर ही संभ्रमात होता. असं म्हणत राज ठाकरे यांनी अनेक शंका वर्तवल्या. मनसेच्या राजू पाटीलना त्यांच्याच गावात एकही मतदान मिळालं नाही. मराठवाड्यात वार्डात पाच हजार मतं घेणाऱ्याला विधानसभेत अडीच हजार मत कशी पडतात? लोकांनी मनसेला मतं दिली पण ती कुठेतरी गायब झाली. अवघ्या चारच महिन्यात लोकांचा कल इतका कसा काय बदलला? ऐतिहासिक विजयानंतर राज्यात कुठेही मोठा जल्लोष का दिसला नाही? असे अनेक सवाल राज ठाकरेंनी केलेत.

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’

'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी

संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
