Vijay Wadettiwar मराठा आणि ओबीसी आरक्षणावर स्पष्टच म्हणाले, ‘माझ्या जीवात जीव असेपर्यंत…’
VIDEO | मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, म्हणाले, 'माझ्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. भले, माझा जीव गेला तरी चालेल. गैरसमज पसरवू नका'
नागपूर, ५ सप्टेंबर २०२३ | ‘आरक्षण वेगळा विषय आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. भले, माझा जीव गेला तरी चालेल’, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केले. ते असेही म्हणाले, मराठा-ओबीसीमध्ये भांडण लावण्याच काम करु नका आणि तसा कोणता गैरसमजही पसरवू नका, सरकार वेगळी भूमिका मांडत असतं आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वेगळं बोलत असतात. नेमकं चाललंय काय? जनतेला फसवण्याचं काम सुरू आहे. असं भाष्य करून सरकार जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत आहे का? मराठा-ओबीसीमध्ये भांडण लावायची काम करत आहात? मराठा समाज समजायचं ते समजेल, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच नुकसान होऊ नये, म्हणून माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका

कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले

त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?

तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला
