Maharashtra assembly speaker election : आजपासून विशेष अधिवेशन, विधानभवनात काय होणार याकडे लक्ष
शिंदे-फडणवीस सरकारसाठी आजचा आणि उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होतंय. यासाठी भाजपकडून त्यांच्या सर्व आमदारांना व्हिप बजावण्यात आलाय. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीने जोर धरला आहे.
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं (Maharashtra assembly speaker) पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीने जोर धरला आहे. राज्यात सर्वात मोठा सत्ताबदल (Maharashtra Political Crisis) घडून आलाय. यामुळे रोज राजकीय घडोमोडींना वेग येतोय. अडीच वर्षांचं ठाकरे सरकार (Uddhav Thackerya) गेलं आणि आता शिंदे-भाजप (Eknath Shinde) सरकार सत्तेत आलंय. शिंदे-फडणवीस सरकारसाठी आजचा आणि उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होतंय. यासाठी भाजपकडून त्यांच्या सर्व आमदारांना व्हिप बजावण्यात आलाय.