NCP Disqualification : मूळ पक्ष कुणाचा? राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला. या निकालाचं वाचन करताना आमदारांच्या संख्याबळावरच पक्ष कुणाचा यावर निर्णय देणार असल्याचे विधानसबा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला. या निकालाचं वाचन करताना आमदारांच्या संख्याबळावरच पक्ष कुणाचा यावर निर्णय देणार असल्याचे विधानसबा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, खरी राष्ट्रवादी कुणाची? मूळ पक्ष कुणाचा? असा प्रश्न कायम असताना दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र मूळ पक्ष कुणाचा हे पक्षाचे संविधान आणि विधिमंडळातील संख्याबळावर ठरवले जाते. या प्रकरणात आपण दोन स्वतंत्र निकाल देणार, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या मुद्द्यावर आपण पहिला निकाल देणार आणि त्यानंतर आपण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देणार असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. तर अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.