Tv9 Exclusive : इमान राखून निकाल दिला की नाही? राहुल नार्वेकर यांनी TV9 मराठीवर रोखठोक सांगितलं…
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल जाहीर केला या निकालानंतर राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केला. तर निकाल प्रामाणिकपणे न दिल्याचा आरोपही केला. यावर आज टिव्ही ९ मराठीच्या रोखठोक मुलाखतीत त्यांनी यावर उघडपणे भाष्य केले आहे.
मुंबई, ११ जानेवारी २०२४ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल जाहीर केला. यानिकालात एकनाथ शिंदे यांचा गट खरी शिवसेना असल्याचे म्हटल्याने एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला. मात्र या निकालानंतर राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केला. तर निकाल प्रामाणिकपणे न दिल्याचा आरोपही केला. यावर आज टिव्ही ९ मराठीच्या रोखठोक मुलाखतीत त्यांनी यावर उघडपणे भाष्य केले आहे. ‘कोण काय आरोप करतं किंवा कुणाला या निकालातून फायदा होईल, वाईट वाटेल, चांगलं वाटेल, या गोष्टींचा मी विचार केला तर मी न्याय बुद्धीने कामच करु शकणार नाही. त्यामुळी मी अशा आरोपांकडे यापूर्वीही लक्ष दिलं नाही, निकाल देतानाही लक्ष दिलं नाही आणि निकाल दिल्यानंतरही लक्ष देण्याची मला गरज वाटत नाही. मी जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत सुस्पष्ट आणि कायद्याला धरुन आहे; असे नार्वेकर म्हणाले. तर प्रत्येक निर्णयातले निकष कसे ठरवले गेले आहेत, त्यापाठी कायदेशीर बाबी काय आहेत, या सगळ्यांचा उल्लेख मी माझ्या ऑर्डरमध्ये केला आहे. त्यामुळे ज्या लोकांना या ऑर्डरविषयी संशय वाटतो, ते समाधान नसतील तर त्यांनी दाखवून द्यावं की त्यामध्ये असं काय आहे, जे कायद्याच्या विपरीत आहे. आरोप करणं सोपं असतं. कुछ तो लोक कहेंगे. कायद्याला धरुन निकाल असेल तर तो तसाच असेल, असेही त्यांनी म्हटले.