मंत्रिमंडळ विस्तार होईना, मला शिक्षणमंत्री करा, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतो, तरूणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“मंत्रिमंडळ विस्तार होईना, मला शिक्षणमंत्री करा, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतो”, तरूणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Aug 03, 2022 | 11:00 AM

राज्यात मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री (Devendra Fadanvis) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिना उलटून गेलाय. तरीदेखील मंत्रीमंडळ विस्तार नाही. विविध खात्यांना मंत्री नसल्याने सरकारी कारभार ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचेही मोठे नुकसान होत आहे. ही स्थिती सहन न झाल्याने औरंगाबादमधील (Aurangabad) एका तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजबच मागणी केली आहे. तुमचा मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत तात्पुरतं […]

राज्यात मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री (Devendra Fadanvis) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिना उलटून गेलाय. तरीदेखील मंत्रीमंडळ विस्तार नाही. विविध खात्यांना मंत्री नसल्याने सरकारी कारभार ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचेही मोठे नुकसान होत आहे. ही स्थिती सहन न झाल्याने औरंगाबादमधील (Aurangabad) एका तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजबच मागणी केली आहे. तुमचा मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत तात्पुरतं शिक्षण खातं माझ्याकडे सोपवला, अशी मागणी तरुणाने केली. अशा आशयाचं निवेदन लिहून त्याने एकनाथ शिंदे यांनाच गाठलं. त्यांच्यासमोर मागणीचं पत्र ठेवलं. तरुणाच्या या अजब मागणीची चर्चा सध्या औरंगाबादेत आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील त्याचं म्हणणं ऐकून घेत लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करून असं आश्वासन दिलं.

Published on: Aug 03, 2022 11:00 AM