अप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शाह यांच्या हस्ते आज ‘महाराष्ट्र भूषण’, जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी
VIDEO | खारघरमधील मैदानात आज अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाचा सर्वोच्च पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' देण्यात येणार
मुंबई : मुंबईच्या खारघर कॉर्पारेट पार्क मैदानात आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार संपन्न होणार आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. खारघरमधील मैदानात शनिवारपासून श्री सेवक येण्यास सुरुवात झाली असून असंख्य श्री सेवकांचं लक्ष आजच्या या कार्यक्रमाकडे लागले आहे. डॉ. दत्तात्रय धर्माधिकारी यांचा जन्म १५ मे १९४६ रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. भजन, कीर्तन, अध्यात्माची आवड त्यांनी लहानपणापासून होती. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचा वसा ते वाहून नेत आहेत. आदिवासी पाड्या, वस्त्या या ठिकाणी त्यांनी व्यसनमुक्तीचे कार्य केले. निर्माल्यातून खत निर्मिती केली. त्यातून पर्यावरण पुरक संदेश त्यांनी समाजाला दिला. अप्पासाहेब हे स्वच्छतादूत म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली तर २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.