आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवरून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवरून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतिने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 2022 या वर्षाचा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वी केंद्र सरकारकडून दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आज रेवदंडा येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.