Maharashtra Board Exam : पोरांनो… तयारीला लागा, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या ‘या’ आहेत तारखा
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षांच्या तारखा जाहीर. फेब्रुवारी ते मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाच्या कधी असणार परीक्षा
मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी ते मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फ घेण्यात येणारी माध्यमिक शालांत आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या तारखा करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ पर्यंत असणार आहे. तर इयत्ता दहावीच्या परीक्षा या १ मार्च ते २६ मार्चपर्यंत असणार आहे. त्यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेचं टेन्शन न घेता मुलांनो आता तयारी लागा…
Published on: Nov 01, 2023 08:22 PM
Latest Videos