Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?
VIDEO | इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल 93.83 टक्के, कोणत्या राज्याचा किती निकाल, जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील लक्ष लागले होते. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे.
विभाग निहाय निकाल
पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%
Published on: Jun 02, 2023 12:52 PM
Latest Videos