budget 2024 : तुम्ही 21 ते 60 वर्षाच्या आहात? मग दरमहिन्याला 1500 रुपये घेऊन जा, काय आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली.
“महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात येईल” अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली. आज अजित पवार यांनी 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. गेल्या काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना या योजनेची चांगलीच चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. दरम्यान, महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
![भारताचे असे 9 महागडे चित्रपट, ज्यांच्या बजेटने तुमचे डोळे विस्फारतील भारताचे असे 9 महागडे चित्रपट, ज्यांच्या बजेटने तुमचे डोळे विस्फारतील](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-21-1.jpeg?w=670&ar=16:9)
![लष्करातील सैनिकही करतात ही युक्ती, मोजून तीन मिनिटांच्या आत येते झोप लष्करातील सैनिकही करतात ही युक्ती, मोजून तीन मिनिटांच्या आत येते झोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-ARMY-1-1-1.jpg?w=670&ar=16:9)
![खतरनाक...फोटो कडक आहे, सोनालीच्या नवीन लुकची जोरदार चर्चा खतरनाक...फोटो कडक आहे, सोनालीच्या नवीन लुकची जोरदार चर्चा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Sonalee-Kulkarni-look-2.jpg?w=670&ar=16:9)
![Lucky Rashi | देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात काही खास राशी, तुमची रास आहे का? Lucky Rashi | देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात काही खास राशी, तुमची रास आहे का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-RASHI-AND-LAKSHMI-3.jpg?w=670&ar=16:9)
![कृती शेट्टीचं मनमोहक सौंदर्य, अदा पाहून चाहते म्हणाले... कृती शेट्टीचं मनमोहक सौंदर्य, अदा पाहून चाहते म्हणाले...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/kruti-7.jpg?w=670&ar=16:9)
![उच्च रक्तदाब असलेल्यांनी कॉफी पिऊ नये? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे... उच्च रक्तदाब असलेल्यांनी कॉफी पिऊ नये? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/coffee-1.jpg?w=670&ar=16:9)