Video : शिंदे गटाकडे नगरविकास, MSRDC खातं राहणार, सूत्रांची माहिती
महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जात होतं. मात्र, भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटपात कुणाचं पारडं जड राहणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस यांच्यात खातेवाटपाचं सूत्र ठरलं असल्याचं […]
महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जात होतं. मात्र, भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटपात कुणाचं पारडं जड राहणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस यांच्यात खातेवाटपाचं सूत्र ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे. दर चार आमदारांमागे एक मंत्रिपद निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार शिंदे गटाला 14 ते 15 तर भाजपच्या वाट्याला 26 ते 27 मंत्रिपद येतील.
Published on: Jul 06, 2022 04:56 PM
Latest Videos