Cabinet Expansion : 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी, त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?

Cabinet Expansion : 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी, त्यावेळी ‘नागपूर’च का निवडलं?

| Updated on: Dec 15, 2024 | 11:57 AM

यंदा नागपूरात मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. मात्र या मंत्रिपदाच्या शपथविधीवेळी कोणा-कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? कोणाला यंदा डच्चू मिळणार हे आजच्या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा आज शपथविधी पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार असून यावेळी भारतीय जनता पक्षाचे 21, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे यावेळी कोणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. दरम्यान, 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूर येथे मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. 1991 मध्ये मंत्री छगन भुजबळांनी 9 आमदारांसह शिवेसना सोडल्यानंतर नागपुरात शपथविधी पार पडला होता. तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमण्यम यांनी त्यांना शपथ दिली होती. नागपूर आणि विदर्भाचं स्थान मजबूत करण्यासाठी शपथविधीसाठी नागपूरची निवड झाल्याची चर्चा आहे.

Published on: Dec 15, 2024 11:57 AM