Cabinet Expansion : धाकधूक कायम… शपथविधीला काही तास अन् भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना अद्याप फोन नाही
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी काही तास उरले असतानाही त्यांना पक्षाकडून कोणताही निरोप किंवा फोन गेल्या नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली असून मंत्रिमंडळाच्या शपथविधीची प्रतिक्षा वाढली आहे.
महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी आज नागपूरात दुपारी ४ वाजता होणार असून एकीकडे शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू आहे. तर दुसरीकडे या मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून भारतीय जनता पक्षाच्या नेते, मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. कारण भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना अद्याप फोनची प्रतिक्षात आहे. शपथविधीसाठी काही तास उरले असतानाही त्यांना पक्षाकडून कोणताही निरोप किंवा फोन गेल्या नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली असून मंत्रिमंडळाच्या शपथविधीची प्रतिक्षा वाढली आहे. अशातच काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी.नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळतेय. भाजपमधून प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगेश सागर, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे, देवयानी फरांदे, राहुल आहेर, राहुल कुल, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण आणि विजय कुमार गावित हे भाजपचे संभाव्य मंत्री आहेत जे मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.