Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ? यादी समोर
येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.
महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महायुतीच्या या शपथविधी सोहळ्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेताना दिसणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरात जय्यत तयारी सुरू असून राजकीय घडामोडींनाही राज्यात वेग आला आहे. अशातच महायुतीतील भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीच्या काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. शिवसेनेच्या उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जैस्वाल, प्रकाश सुर्वे, राजेश क्षीरसागर आणि विजय शिवतारे या शिलेदारांची मंत्रिपदासाठी वर्णी लागू शकते तर भाजपमधून रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, , पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, बबनराव लोणीकर, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, संभाजी निलंगेकर, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, संजय कुटे हे संभाव्या मंत्री आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कोण आहेत संभाव्य मंत्री बघा यादी?