Cabinate Expansion : आज मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला मिळणार डच्चू?

Cabinate Expansion : आज मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला मिळणार डच्चू?

| Updated on: Dec 15, 2024 | 10:25 AM

आज दुपारी चार वाजता नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे महायुती सरकारचे नवे मंत्री शपथ घेणार आहे. या शपथविधींच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंके, कुमार आयलानी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर निश्चित झाली आहे. आज दुपारी चार वाजता नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे महायुती सरकारचे नवे मंत्री शपथ घेणार आहे. दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सागर बंगला आणि वर्षा बंगल्यावर भेटीगाठींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. या शपथविधींच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंके, कुमार आयलानी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. यासोबत शिवसेना आमदार संजय राठोड, संजय शिरसाट आणि संतोष दानवे यांची देखील रिघ रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पाहायला मिळाली. तर यासोबत भाजप आमदार नमिता मुंदडा आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली. यानंतर संजय शिरसाट, दादा भुसे आणि रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे. काल रात्री अनेक आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या वर्षांवर जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 15, 2024 10:25 AM