अखेर ठरलं... उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?

अखेर ठरलं… उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?

| Updated on: Dec 14, 2024 | 11:57 AM

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि कुठे होणार याबद्दलचीही अपडेट समोर आली आहे. येत्या १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता नागपूरातच नव्या सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला. यावेळी महायुतीला बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात फडणवीस सरकार स्थापन झालं. मात्र यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अशातच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि कुठे होणार याबद्दलचीही अपडेट समोर आली आहे. येत्या १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता नागपूरातच नव्या सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. येत्या १६ डिसेंबरपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे. त्यापूर्वी १५ डिसेंबरला संध्याकाळी ४ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यासोबतच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप २१, शिवसेना १३ तर राष्ट्रवादी ०९ मंत्री शपथ घेतील अशी माहिती समोर येत आहे.

Published on: Dec 14, 2024 11:57 AM