Maharashtra Cabinet: आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

| Updated on: Aug 09, 2022 | 12:25 PM

भाजपमध्ये आमदार सुधीर मुंगटनटींवर यांचे महत्त्वाचे स्थान असून यंदाची त्यांची आमदारकीची सहावी टर्म आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये मुनगंटीवार यांची मंत्रीपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चितच होते.

चंद्रपूर मतदार संघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे जेष्ठ नेते आहेत. याआधी ते भाजप सरकारमध्ये अर्थमंत्री होते. भाजपमध्ये आमदार सुधीर मुंगटनटींवर यांचे महत्त्वाचे स्थान असून यंदाची त्यांची आमदारकीची सहावी टर्म आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये मुनगंटीवार यांची मंत्रीपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चितच होते. आता त्यांच्या वाट्याला कुठले खाते येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे जाहीर करण्यात आले होते त्यानुसार मंत्रीपदी दोनीही पक्षातील किती मंत्र्यांची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपच्या नऊ आणि शिंदे गटाचे  नऊ अशा एकूण 18 आमदारांनी आज शपथ घेतली.