Eknath Shinde : 'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात नेमकं काय झालं?

Eknath Shinde : ‘ए अंबादास खाली बस…’, शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात नेमकं काय झालं?

| Updated on: Dec 19, 2024 | 5:36 PM

हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विधानपरिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमकं काय झालं?

राज्यात विधिमंडळाचं सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विधानपरिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे विधानपरिषदेतील सभागृहात भाषण करत असताना विरोधकांकडून एकच राडा घातला. एकनाथ शिंदे आपले मुद्दे मांडत असताना ठाकरे गटाचे अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी गोंधळ घातल्यानंतर शिंदे आक्रमक झाले. एकनाथ शिंदे बोलत असताना ‘ए आंबादास खाली बस…, ए आंबादास खाली बस…’ अशा घोषणा सभागृहात ऐकायला मिळाल्यात. सभागृहातील या गोंधळानंतर शिवसेनेच्या विधानपरिषद आमदार-उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि शिंदेंना बोलण्याची विनंती केली. ‘राज्यपालांच्या अभिभाषण यांनी पूर्ण वाचलं असले तर महायुती सरकारने काय-काय केलंय हे म्हटलंय. तर विरोधकांनी त्याची टिंगल उडवली. मग आम्ही काय केलं हे बोलायला नको… तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा’, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांनाच फटकारलं.

Published on: Dec 19, 2024 05:36 PM