CM Eknath Shinde : मिटने वाला मैं नाम नहीं… संसदेत एकनाथ शिंदेंची कविता अन् मोदीही भारावले, बघा VIDEO
NDA Parliamentary Party Meeting : नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांसारख्या आघाडीतील अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करणाऱ्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कविता सादर केली. एकनाथ शिंदे म्हणाले....
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. मोदींच्या नावाचा प्रस्ताव राजनाथ सिंह यांनी ठेवला होता, त्याला पक्षाकडून नितीन गडकरी आणि अमित शहा यांनी मान्यता दिली होती. याशिवाय नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांसारख्या आघाडीतील अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करणाऱ्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कविता सादर केली. एकनाथ शिंदे म्हणाले, जनतेने विकासाला महत्त्व दिले आहे. विरोधी पक्ष फक्त राजकारण करायचे, त्यांना जनतेने घरी बसवले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या 10 वर्षात मोदींनी देशाला आघाडीवर नेले आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांनीही नरेंद्र मोदींच्या नावाला अनुमोदन देत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. बघा शिंदेंनी काय केली कविता?
मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसे नदियों ने सींचा है,
बंजर माटी में पलकर मैंने, मृत्यु से जीवन खींचा है।
मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे।
मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे।