मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर, कसं असणार नियोजन?
VIDEO | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या अयोध्येच्या दौऱ्यावर, खासदार आणि आमदारांसह एकनाथ शिंदे दोन दिवस अयोध्येत राहणार
अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी झाली आहे. शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आधीपासूनच अयोध्येत दाखल झाले आहेत. 8 एप्रिल रोजी एकनाथ शिंदे लखनऊला पोहोचतील. आमदार, खासदारांसह ते लखनऊच्या हॉटेलमध्ये मुक्काम करतील. तर 9 एप्रिल रोजी लखनऊमधील मुक्कामानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल होतील. दुपारी 12 वाजता श्रीरामाची महाआरती करतील,12.20 वाजता राम मंदिराच्या कामाची पाहणी करतील, 2.30 वाजता पत्रकार परिषद घेतील, दुपारी 3 अयोध्येतील लक्ष्मण किल्ल्याला भेट देतील, संध्याकाळी 6 वाजता शरयू नदीवर महाआरती आणि रात्री 9 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील.