राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात 44 हजारांपेक्षा अधिक रुग्ण

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात 44 हजारांपेक्षा अधिक रुग्ण

| Updated on: Jan 09, 2022 | 10:29 PM

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची लागण झालेले दोनशेहून अधिक रुग्ण आज आढळून आले आहेत.

मुंबई : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्क्यांवर पोहोचलाय. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात 10 लाख 76 हजार 996 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण आहेत.