Nalasopara | नालासोपाऱ्यात कुख्यात गुंडाची पोलिसांनी काढली धिंड?
सोमवारी दुपारच्या सुमारास अन्सारीला आपल्याच परिसरात हातकडी घालून पोलीस फिरवत होते. यावेळी अन्सारीच्या दहशतीखाली असणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि छुप्या पद्धतीने त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.
स्वतःचे वर्चस्व वाढवण्यासाठी नालासोपारा पूर्व परिसरात जावेद अन्सारी हा गुंड दहशत पसरवत होता. अन्सारीला त्याच्याच परिसरात हातकडी घालून खुलेआम फिरवत अक्षरशः धिंड काढण्यात आली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी मात्र ही धिंड नसून त्याला गुन्ह्यातील घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी नेल्याचा दावा केला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास अन्सारीला आपल्याच परिसरात हातकडी घालून पोलीस फिरवत होते. यावेळी अन्सारीच्या दहशतीखाली असणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि छुप्या पद्धतीने त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.
Latest Videos