Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपारी अन् आत्महत्या... राज्यात कुठे घडल्या 3 हादरणाऱ्या घटना, नेमकं काय घडलं?

सुपारी अन् आत्महत्या… राज्यात कुठे घडल्या 3 हादरणाऱ्या घटना, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 29, 2025 | 12:12 PM

अल्पवयीन मुलांमधल्या वाढत्या गुन्हेगारीन पालकांच्या चिंतेत भर पडलीये. गेल्या दोन दिवसात राज्यात तीन धक्कादायक घटना घडल्यात. नाागपूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्यात दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केलीये तर पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये एका अल्पवयीन मुलाने आपल्याच मैत्रिणीच्या हत्येची सुपारी दिली. पाहुया हा रिपोर्ट.

अल्पवयीन मुलांच्या पालकांची चिंता वाढवणाऱ्या आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या तीन घटना आहेत. पहिली घटना आहे नाागपुरातली. धनतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षाच्या मुलीन ऑनलाईन गेमच्या टास्कमुळे आपला जीव गमावला. १७ वर्षाची ही मुलगी सतत ऑनलाईन गेम खेळायची. डेथ हा शब्द गुगलवर सर्च करायची. ही मुलगी एका ऑनलाईन गेमच्या अखेरच्या टास्कमध्ये असावी असा संशय आहे. आत्महत्येपूर्वी तिने ऑनलाईन चाकू मागवल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय. सोमवारी सकाळी आईवडिलांना ती रक्ताच्या थारोळ्यात सापडली. मात्र यावर अजूनपर्यंत कुठलीही स्पष्टता नाही. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे. दुसरी घटना आहे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातली. माढा तालुक्यातल्या अडेगावमध्ये आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात जवान आहेत. त्यांचीच रिव्हॉल्व्हर घेऊन घरातल्या खुर्चीवर बसून मुलांन आत्महत्या केलीये.

तर तिसरी घटना आहे पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातली. दौंडमधल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाने त्याच्या सोबत शिकणाऱ्या एका मुलीची बलात्कार करून हत्या करण्याची सुपारीस दिली. विद्यार्थ्यांन पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. त्याची तक्रार त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीन शिक्षकांकडे केली. याचाच राग मनात धरून या विद्यार्थ्यांन दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला या मुलीवर बलात्कार करण्याची आणि तिची हत्या करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिली.

Published on: Jan 29, 2025 12:12 PM