मातोश्री परिसरात शिंदे गटाची बॅनरबाजी अन् पुन्हा ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न
VIDEO | मुंबई शिंदे गट आणि ठाकरे गटात बॅनर वॉर, उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न, कोणत्या आशयाचे लावले बॅनर्स?
मुंबई : १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील बांद्रा बीकेसी येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे. अशातच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. मातोश्रीच्या बाहेर भोवतालच्या परिसरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देणारे बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील मातोश्री येथे शिंदे गट आणि ठाकरे गटात बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेने बॅनरबाजी करून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय तर राष्ट्रीय कर्मचारी सेनेकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या या बॅनवर दिसताय. मुंबईतील शिवाजी पार्क पासून ते माहीमच्या सिग्नलपर्यंत मविआच्या सभेचे बॅनर पाहायला मिळत आहेत तर १ मे रोजी असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरने पुन्हा एकदा वाद शिंदे-ठाकरे यांच्यात वाद निर्माण होण्याचे चित्र दिसतेय.