Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा नाराज? सार्वजनिक कार्यक्रमांना गैरहजर, प्रफुल्ल पटेल म्हणाले…
VIDEO | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा नाराज? गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.
मुंबई, २९ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा नाराज असल्याची चर्चा कानावर पडत आहे. अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांना जात नसल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहेत. या सुरू असलेल्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पूर्णविराम दिला आहे. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करून स्पष्टीकरण दिले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करून अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, कालपासून अजित पवारांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. ते बरे झाल्यानंतर पुन्हा जोमाने आपल्या कामाला लागतील.