Devendra Fadnavis यांनी ठणकावून सांगितलं…भाजपच मोठा भाऊ अन् बॉस

VIDEO | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... 'महायुतीमध्ये मोठा भाऊ आणि बॉस हा भाजपचं', मुंबईतल्या लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत फडणवीसांनी भाजपचं मुख्य भूमिकेत असल्याचं सांगितलं आणि म्हटलं आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी असली, तरी...

Devendra Fadnavis यांनी ठणकावून सांगितलं...भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
| Updated on: Oct 04, 2023 | 11:21 AM

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | देवेंद्र फडणवीस हे शिंदे गट किंवा अजित दादांच्या गटाबद्दल उघडपणे बोलत नाहीत. मात्र महायुतीत भाजपच मोठा भाऊ आणि बॉस असल्याचं फडणवीस म्हणालेत. त्यामुळं अचानक फडणवीस असं का म्हणालेत, त्यावरुन चर्चा सुरु झाली आहे. मात्र फडणवीस, सत्तारांनी महाराष्ट्रात शिंदेच बॉस असल्याचं सांगून उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. भाजपच मोठा भाऊ हे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावून सांगितलं. मुंबईतल्या लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत, पदाधिकाऱ्यांसमोर फडणवीसांनी भाजपचं मुख्य भूमिकेत असल्याचं सांगितलं. आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी असली, तरी राज्यात भाजप इज ऑल्वेज बॉस, भाजप सर्वात मोठा पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणायची जबाबदारी आपली, युती मधील सर्व पक्षांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे, इथं मी उभा आहे तो पक्षामुळेच आणि मी पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझेही डिपॉझिट जप्त होईल. दरम्यान, फडणवीसांना शिंदेंचे मंत्री अब्दुल सत्तारांनी उत्तर दिलंय. भाजप देशात बॉस पण महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच बॉस असल्याचं अब्दुल सत्तार म्हणालेत.

Follow us
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.