नागपूरची जागा भाजपनं लढवली असती तर.. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक, म्हणाले...
मुंबई : नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच नागपूर, कोकण आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी काल मतमोजणी सुरू झाली. यापैकी नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल रात्री उशिरापर्यंत लागले. अमरावतीत मविआपुढे तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. नागपुरात महाविकास आघाडीच्या सुधाकर अडबालेंचा विजय झाला तर ना. गो. गाणार यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरची जागा भाजपनं लढवली असती तर जिंकलो असतो. अपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही भरघोस मतं घेतली असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांनी अभिनंदन केले आहे. मविआने टार्गेट केल्यानंतरही सत्यजित तांबे विजयी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.