Devendra Fadnavis यांचा आदित्य ठाकरे यांना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'

Devendra Fadnavis यांचा आदित्य ठाकरे यांना टोला; म्हणाले, ‘मी बालबुद्धीला उत्तर…’

| Updated on: Oct 01, 2023 | 1:42 PM

VIDEO | छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात परत आणली जाणार आहे. यावरून राज्यात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही होताय. दरम्यान ती शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारने यावर स्पष्टता करावी, अशी मागणी केली आहे.

मुंबई, १ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं लंडनवरून 16 नोव्हेंबर रोजी भारतात परत आणण्यात येणार आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे यांना खोचक टोलाही लगावला आहे. ‘संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? पुरावे मागणं ही त्यांची परंपरा आहे. त्यामुळे मी बालबुद्धीवर काय बोलणार?’, असा सवाल करत जिव्हारी लागणारी टीका फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. तर छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं म्हणजे शिवसेना आहे हे लक्षात ठेवा. गेल्या ५० वर्षांपासून महाराष्ट्रात येणाऱ्या आक्रमणाचा कोथळा या वाघनखांनी काढलाय आणि आता तीच वाघनखं नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय. असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Published on: Oct 01, 2023 01:36 PM