Sanjay Raut ‘त्या’ लायकीचे नाहीत, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
VIDEO | 'रावणाने ज्या पद्धतीने लोकांवर अत्याचार केलेत तसेच महाराष्ट्र आणि दिल्लीतील सरकार लोकांवर अत्याचार करत आहे', संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांची लायकीच काढली
अकोला, ७ ऑक्टोबर २०२३ | भाजपचे काम करण्याची पद्धत रावणासारखी आहे. रावणाने ज्यापद्धतीने लोकांवर अत्याचार केलेत तसेच महाराष्ट्र आणि दिल्लीतील सरकार लोकांवर अत्याचार करत आहे. रावण कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. आमचे सरकार आल्यावर रामराज्य निर्माण होईल, असे म्हणत ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर टीका केल्याचे पाहायला मिळाले. या टीकेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी संजय राऊत यांची लायकी काढल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत हे कोणतेही उत्तर देण्याच्या लायकीचे नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलेत. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या टीकेवर फडणवीस म्हणाले, संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. तर ठाकरे गटाने यापूर्वीच रामराज्याच्या संकल्पना सोडून दिली आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते अकोल्यात असताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.