Video : तरुणाच्या हत्येने धुळे हादरलं, दोन संशयित अटकेत
धुळे शहर तरुणाच्या हत्येनं (Dhule Murder News) हादरलं आहे. धुळे शहरातली कुमार नगर परिसरात गोळीबार (Dhule crime news) करत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारामध्ये चिनू उर्फ चंद्र राजेंद्र पोपली हा तरुण ठार झाला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या हत्येमुळे एकच खळबळ धुळे शहरात पसरली आहे. मध्यरात्री ही […]
धुळे शहर तरुणाच्या हत्येनं (Dhule Murder News) हादरलं आहे. धुळे शहरातली कुमार नगर परिसरात गोळीबार (Dhule crime news) करत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारामध्ये चिनू उर्फ चंद्र राजेंद्र पोपली हा तरुण ठार झाला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या हत्येमुळे एकच खळबळ धुळे शहरात पसरली आहे. मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबार प्रकरणी धुळे पोलिसांनीही दोघांवर कारवाई केलीय. दोघा संशयितांना पोलिसांनी (Dhule Police) ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी धुळे पोलीस करत आहेत. मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. संशयित आरोपींच्या चौकशीतून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.
Published on: Aug 06, 2022 11:45 AM
Latest Videos