महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कवर ध्वजारोहण, बघा पोलिसांचं पथसंचलन
VIDEO | महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर ध्वजारोहण कार्यक्रम, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही उपस्थित
मुंबई : राज्यासह देशभरात आज १ मे रोजी महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. तर महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ध्वजारोहण कार्यक्रम देखील उत्साहात संपन्न झाला. यासाठी राज्याचे राज्यपाल रमेश बैस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिवाजी पार्कवरील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलिसांकडून पथसंचलन देखील करण्यात आल्याचे पाहायला मिळाले, तर आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मध्यरात्री हुतात्मा स्मारकावर हजेरी लावली. तसेच हुतात्म्यांना वंदन केलं. यासह एकनाथ शिंदे यांनीही महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादनं केलं. त्यांनी पुष्पहार अर्पण केले. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले.