Exit Poll Results 2024 : पोल ऑफ पोल, विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
येत्या तीन दिवसांत म्हणजेच 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीतून राज्यात कोणाची सत्ता येऊ शकते, महाविकास आघाडी की महायुती? कोणाचं पारडं यंदा असणा जड असणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक पसंती दिली आहे ते येत्या तीन दिवसांत म्हणजेच 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीतून राज्यात कोणाची सत्ता येऊ शकते, महाविकास आघाडी की महायुती? कोणाचं पारडं यंदा असणा जड? याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चाणक्यच्या पोलनुसार महायुतीला यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पी-मार्कच्या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळणार? पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीला 152 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 126 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 110 ते 130 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे.