Today’s Chanakya Exit Poll : राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार, महायुती की मविआ? काय सांगतोय एक्झिट पोल?
टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महायुतीला १७५ तर महाविकास आघाडीला १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. यासह इतरांना १३ जागा मिळण्याचा अंदाज...
टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महायुतीला १७५ तर महाविकास आघाडीला १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. यासह इतरांना १३ जागा मिळण्याचा अंदाजही टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं असून महाराष्ट्रात एकूण मतदान हे ६२. ०२ टक्के इतकं झालं आहे. म्हणजेच ६ कोटी २१ लाख मतदारांनी मतदान केलं. २०१९ मध्ये ६१. ४ टक्के मतदान झालं होतं म्हणजेच यंदा ३. ६ टक्क्यांनी मतदान वाढलं आहे. गेल्या बुधवारी राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. त्यामुळे उद्या, येत्या २३ तारखेला कोणाला बहुमत मिळणार आणि कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये सर्वाधिक एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र टीव्ही 9 रिपोर्टर पोलच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी कदाचित बहुमताचा आकडा गाठण्यात यशस्वी होऊ शकते. महाविकास आघाडीला १३६ ते १४५ जागांवर तर महायुतीला १२९ ते १३९ जागा मिळण्याची शक्यता आहे.