राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं, निवडणूक आयोगाकडूनं काय केली मोठी घोषणा?
VIDEO | राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील 2,359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आणि 2,950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या पदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे.
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 या दिवशी मतदान होणार आहे. याबाबतची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. तर 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल, असं यू. पी. एस. मदान यांनी सांगितलं.
Published on: Oct 03, 2023 06:15 PM
Latest Videos