Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Election Result 2024 : भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ; बघा विजयावर विश्लेषणात्मक रिपोर्ट

Assembly Election Result 2024 : भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ; बघा विजयावर विश्लेषणात्मक रिपोर्ट

| Updated on: Nov 24, 2024 | 10:53 AM

महायुतीच्या पारड्यात मतदारांनी छप्परफाड मतं टाकली आणि भाजपचा २०१४ पासूनचा सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय झाला. त्यामुळे या विजयाचे महत्त्व भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषातून सहज लक्षात येतंय.

महाराष्ट्राने पुन्हा एकदा भाजप आणि महायुतीच्या सरकारला आपला कौल दिला आहे. पण महायुतीची त्सुनामी अशी आली की २०० च्या पार गेली. मतदारांची पसंती पाहता महायुतीने विकासकामांची पोहोचपावती असल्याचे म्हटले आहे. तर ईव्हीएमचा विजय असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली. महायुतीच्या पारड्यात मतदारांनी छप्परफाड मतं टाकली आणि भाजपचा २०१४ पासूनचा सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय झाला. त्यामुळे या विजयाचे महत्त्व भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषातून सहज लक्षात येतंय. महायुतीचे तब्बल २३१ तर मविआचे अवघे ४५ आमदार आलेत. तर इतरांच्या खात्यात १२ जागा गेल्यात. भाजपला इतिहासातील सर्वाधिक १३३ जागा मिळाल्या. तर शिवेसनेला ५७ आणि राष्ट्रवादीचे ४१ आमदार आलेत. महाविकास आघाडीचा निकाल पाहायचा झाला तर काँग्रेसला १५, ठाकरेंच्या शिवसेनेला २० आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्यात. यावरून असे लक्षात येते की शरद पवारांचे धक्कादायकरित्या मोठं नुकसान झालंय. तर महायुतीच्या बंपर विजयाची कारणं नेमकी काय? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 24, 2024 10:53 AM