Assembly Election Result 2024 : दिग्गज नेत्यांमध्ये कोणा-कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत अनेक बड्या नेत्यांचा दारूण पराभव झाला. संगमनेरमधून काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून चर्चेत राहणारे बाळासाहेब थोरात यांचा शिंदे गटाच्या नवख्या अमोल खताळांकडून १० हजार ५६० मतांनी पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप आणि महायुतीचा बंपर विजय झाला. मात्र या निवडणुकीत अनेक दिग्गज पडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत अनेक बड्या नेत्यांचा दारूण पराभव झाला. संगमनेरमधून काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून चर्चेत राहणारे बाळासाहेब थोरात यांचा शिंदे गटाच्या नवख्या अमोल खताळांकडून १० हजार ५६० मतांनी पराभव झाला. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय. तिवसा येथून काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपच्या राजेश वानखेडेंकडून ७ हजार ६१७ मतांनी पराभूत झालाय. वसईतील बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा भाजपच्या नवख्या उमेदवार स्नेहा दुबे यांच्या कडून अवघ्या ३ हजार १५३ मतांनी पराभव झालाय. अचलपूरमधून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी-दिव्यांग वर्गांचे राजकारण करणारे बच्चू कडू यांना यंदा पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. त्यांना भाजपच्या प्रवीण तायडे यांच्याकडून १२ हजार १३१ मतांनी पराभव पत्कारावा लागलाय. यंदा अपक्षांच्या जोरावर सत्ता स्थापन होईल त्यात आपण असून आणि आपण किंगमेकर असू असा त्यांना विश्वास होता मात्र त्यांचा दारूण पराभव झालाय. कोकणातील ठाकरे गटातील प्रमुख नेते, कुडाचे वैभव नाईक यांचाही यंदा पराभव झालाय. शिंदेंच्या सेनेकडून लढलेल्या निलेश राणेंकडून ८ हजार १७६ मतांनी त्यांच्या पराभव झालाय.