Assembly Election Result 2024 : 'लाडक्या बहिणी' वनसाईड महायुतीच्या बाजूने, पुन्हा सत्तेच्या दिशेने वाटचाल

Assembly Election Result 2024 : ‘लाडक्या बहिणी’ वनसाईड महायुतीच्या बाजूने, पुन्हा सत्तेच्या दिशेने वाटचाल

| Updated on: Nov 23, 2024 | 11:27 AM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. संपूर्ण राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. त्यामुळे महिला मतदारांनी महायुतीला आपला कौल दिल्याचे दिसतेय. 

महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली. या टफ फाईटमध्ये राज्यात कोणाची सत्ता येणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या आकड्यांवरून भाजप महायुतीने बाजी मारल्याचं चित्र समोर येत आहे. समोर येत असलेल्या कलांनुसार, महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची लाट असल्याचे निवडणुकीच्या मतमोजणीवरून स्पष्ट होत आहे. महायुती रेकॉर्डब्रेक बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असून 215 जागांच्या पुढे आहे. महायुतीला मिळणारं यश आणि समोर येणाऱ्या महायुतीच्या आकड्यांवरून लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या 4 महिन्यांपूर्वीच सरकारने लाडकी बहीण योजना आणली. चार महिन्यांचे साडे सात हजार रूपये अडीच कोटी महिलांच्या खात्यात टाकले. सरकारचा प्रचार लाडक्या बहिणीवरूनच केंद्रीत झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. संपूर्ण राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना साडे सात हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. त्यामुळे महिला मतदारांनी महायुतीला आपला कौल दिल्याचे दिसतेय.

Published on: Nov 23, 2024 11:26 AM